हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांत तुफान राडेबाजी झाली. दोन्ही पक्षांतील कार्यालयांवर हल्लेही झाले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद शदला. शिवसेना व भाजप कार्यालयांवर झालेले हल्ले हे केवळ घुसखोरांमुळे झालेले आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्यांकडून अशा प्रकारचे काम केले गेले असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणे व प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली. यावेळी राऊत म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेचा हेतू आपल्या महाराष्ट्रातील लोकांना समजलेला नाही. मोदींनी हि यात्रा सरकार काय करतंय याची माहिती देण्यासाठी काढावी असे मोदींनी सांगितले. मात्र, मोदींच्या सूचना राहिल्या बाजूला. हे नेते विरोधकांवरच टीका करीत आहेत. वास्तविक पाहता शिवसेना व भाजपच्या कार्यालयांवर जे हल्ले झालेले आहेत. ते शिवसेनेतून व बाहेरून जे भाजपमध्ये घुसखोर आले. त्यांच्याकडून दोन्ही पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले आहेत.
वास्तविक पाहता हि आंदोलने का झाली याचा विचार करावी. महाराष्ट्रात आजपर्यंत शिवसेना विरुद्ध भाजपा यांचे अनेकदा मतभेद झाले असले तर एकमेकांवर चाल करून जाण्याची वेळ आली नव्हती. आमचे वैचारिक मतभेद झाले होते. आम्ही वेगळ्या निवडणुका लढलो. भाजप व शिवसेनेत कायम एक वैचारिक नातेबंध राहिला आहे हिंदुत्वाच्या मुद्यावरून मात्र, बाहेरून आलेल्यांकडून हल्ले केले जातायत.