हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कश्मीर खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे,अशी टीका राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद होणे हे चिंता वाढविणारे आहे.
पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असे राऊत यांनी म्हंटले आहे.