जलयुक्त शिवारच पाणी कोणी जिरवलं याचा तपास सुरु आहे – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जलयुक्त शिवाराची स्वतंत्र चौकशी एसआयटी, लाचलुचपत विभागाकडून सुरु आहे. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजने बाबत अनेक जिल्हे आणि तालुक्यात डबके तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरु आहे, असे राऊत यांनी सांगितले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमसनही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या कामांची स्वतंत्रपणे एसआयटी, लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना अचानक निर्दोष ठरवले जाणे. क्लिन चीटचे कमळ कसे उगवले ? याबाबात शंका निर्माण होत आहे. कोणीतरी ही कारस्थान करत आहे.

आमच्यावर चिखल उडवायचा दोषी म्हणून आणि स्वत:वर आले तर निर्दोष. हा पोरखेळ बंद व्हायला पाहिजे. या महाराष्ट्रात जो पोरखेळ सुरुय तो बंद व्हायला पाहिजे. जलयुक्त शिवाराचे आरोप शेकडो कोटींचा आहे. हे आरोप बघितल्यानंतर मला बिहारमधल्या चारा घोटाळ्याची माहिती झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात चारा घोटाळा झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराबाबत अनेक जिल्हे आणि तालुक्यात डबके तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले.

You might also like