नवी दिल्ली । राज्यात विरोधी पक्षांत असलेल्या भाजपाने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला टीकेच्या धारेवर धरलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी, राम मंदिर यासारख्या मुद्द्यांवर भाजपा सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, ”राज कुमार यांचा एक डायलॉग मला आजही आठवतोय, राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है. “चिनाय सेठ. जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते” समझने वालोंको इशारा काफी है!! जय महाराष्ट्र!” असं म्हणत राऊतांनी नाव न घेता भाजपासह विरोधी पक्षांना इशारा दिला आहे.
राम मंदिर भूमिपूजनाविषयी उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य, राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीसांचा तपास यामुळे गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारला सातत्याने टीका करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्याचीही टीका विरोधकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सूचक शब्दांत शिवसेनेची भूमिका मांडली आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेला विरोधी पक्ष काय प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”