मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आरएसएस आणि भाजपाची बाजू जोरदारपणे मांडली. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावरही हल्लाबोल केला. शिवसेना आमचीच, गद्दारी आम्ही नाही केली उध्दव ठाकरेंनी केली. आम्ही उठाव, क्रांती केली असल्याचे म्हणाले.
1)आरएसएस संघाचे देशासाठी मोठे योगदान
2) शिवसेना खासगी कंपनी नाही
3) चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. त्यांची खिल्ली उडवताय.
4) नरेंद्र मोंदी साहेबांनी देशाचा डंका जगभरात वाजविला. सगळ्या जगला भारत देशाची भुरळ घातली. या देशाचे नाव मोंदींनी जगभर पसरविले. या देशाच्या गृहमंत्र्याना तुम्ही अफझलखान म्हणताय. ज्यांनी काश्मीरमधील 370 कलम हटविले, हे स्वप्न बाळासाहेबाचं होतं.
5) बाळासाहेबाचं स्वप्न व विचार मोंदी आणि अमित भाई शहा यांनी पूर्ण केले.
6) ज्यांनी चहावाले बोलले त्याच्या पक्षाचे काय झाले ते बघा. तुमची पण वेळ….
7) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तुम्ही ताटावरून उठविले.
8)मी इंदिरा गांधीचा आदर करायचो.
9)सावरकरांचा अपमान सहन करणार नाही.
10) तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली.
11) बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले.
12) सत्ता गेल्यानंतर शाखाप्रमुख, शिवसैनिक आठवले.
13) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व आजार गेले, पट्टा गेला.
14) बाळासाहेबांच्या वाट्याला अवहेलना आली.
15) तुम्ही वर्क फाॅर्म होम करत होता. आम्ही कधी घरी जायचो की नाही माहिती नव्हते.
16) हम दो हमारे दो पुढे तुमचं कुटुंब गेलच नाही.
17) पुरात एकनाथ शिंदे चिपळूण, महाड, केरळ कुठे नाही गेला.
18) दाऊद, याकूब मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी, शहाचे हस्तक असल्याचा मला अभिमान आहे.
19) सगळ्या समाजाला न्याय दिला जाईल. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही.
20) कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारखा दुटप्पी राजकारणी नव्हता असा टोला उध्दव ठाकरेंना लगावला.
21) इमोशल ब्लॅकमेलिंग चालणार नाही, कोथळा जावूदे कधी तुम्ही चापट तरी मांडली आहे का? असा टोला उध्दव ठाकरेंना लगावला.
22) माझ्या नातवाचा (रूद्रराज) जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झाले.
23) पायाखालची वाळू सरकल्याने किती, काहीही बोलायचे.
24) बाळासाहेबांचे विचार तोडून, मोडून तुम्ही शपथ घेतली. मी छातीवर दगड ठेवून तुमच्यासोबत आलो.
25) एकनाथ शिंदेला काहीही मोह नाही. अजून मी वर्षावर रहायलाही गेलो नाही.
26) मी तुमच्यासाठी त्याग केला. माझ्या कुटुंबाने त्याग केला आहे. मी माझ्या वडिलांना 15- 15 दिवस भेटत नव्हते.
27) देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता मिळाला. परंतु उध्दव ठाकरेंना त्यांची किंमत नाही.
28) आनंद दिघे साहेब म्हणायचे एक दिवस मी ठाण्याचा मुख्यमंत्री करणार. तुम्ही त्यांचेही पाय कापले.
29) वेदांता प्रकल्प तुम्ही टक्केवारी मागत होता, म्हणून गेली.