मुंबई | माजी मुख्यमंत्री व शिवसेन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजप- शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे
1)ज्यांना आपण सगळं काही दिलं. ज्यांना काही दिल नाही ते नाराज होवून गेले. त्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद दिली. तरी भूक थांबली नाही.
2) शिवसेना एकट्या दुखट्यांची नाही, शिवसेना शिवसैनिकांची आहे. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल, गेट आऊट त्यादिवशी मी असा थेट निघून जावून.
3) बाप मंत्री, मुलगा खासदार नातू नगरसेवक अरे तो शाळेत तरी जावूदे म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला दिला.
4) ज्यांनी कट केला ते कटप्पा असाही एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
5) महाविकास आघाडी केली, तेव्हा ते शेजारीच बसले होते, तेव्हा बोलायचे होते. तेव्हा दाढी तोडात गेली होती का.
6) आई- वडिलांची शपथ घेवून आणि शिवरायांच्या साक्षीने सांगतो, अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणी ठरली होती.
7) अरे मंत्रीपद दिले, त्यानंतर आता मुख्यमंत्रीपद झाला आता शिवसेना प्रमुख पद पाहिजे.
8) आनंद दिघे या एकनिष्ठ शिवसैनिकाला जावून 20 वर्षे झाले, आता ते बोलू शकत नाही. ते भगव्यातून गेले.
9) देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो, हा टोमणा नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल, आले अन् दीड दिवसांत लगेच गेले. आता परत आले उपमुख्यमंत्रीपद म्हणून.
10) आम्ही कायदा पाळायचं, तुम्ही डुकरं पाळायची, असा शिंदे व फडणवीस गटाला टोला.
11) मिद्दे गटात येण्यासाठी धमकी दिली जाते. केसेस बाहेर काढायची शिवसेनेच्या कार्यकर्त्याना म्हणतायत, कसल्या केसेस काढताय… तुमचे काय सलूनचे दुकान आहे का
12) आम्ही भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले नाही.
13) पाकिस्तानात जिनाच्या थडग्यावर डोके ठेवणारी तुमची आैलाद, शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाणारे तुमचे नेते… केक खाण्यासाठी जातात. काश्मीरात मेहबूब मुक्ती सोबत सत्ता स्थापन करणारे तुम्ही आम्हांला हिदुत्व शिकवता. तेव्हा तुम्ही हिदुत्व शिकवण्याची गरज नाही.
14)ह्दयात राम आणि हाताला काम पाहिजे. गाईवर नको महागाईवर बोला. चलन घसरते, देशाची पत घसरतेय.
15) अमित शहा देशाचे गृहमंत्री की घरगुती मंत्री
16) कोबडी चोरावर, बाप चोरांवर जास्ती बोलायच नाही.
17) उध्दव ठाकरेंच विचार ऐकायला आलेले आहेत. मी काय विचार देणार…. ती मी परंपरा पुढे नेतोय ….एका व्यासपीठावर यावे, मी माझे हिदुत्व
18) उद्या शिंदे सरकारची 100 दिवस भरत आहेत. त्यामधील 90 दिवस ते दिल्लीला गेले असतील. दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ.
19) प्रत्येकाने आपआपला धर्म घरात ठेवावा. स्टेन गन घेवून आतंकवादी उभा असेल तर राम राम करून आतंकवादी पळणार नाही. त्याच्यासमोर स्टेन गन घेवून समोर उभे राहिले पाहिजे.
20) सगळे पक्ष संपवायचे अन् एकच पक्ष ठेवायचा म्हणजे आपला भारत देश गुलामगिरी कडे नेतायत.
21) मोहन भागवत यांच्या बद्दल मला आदर आहे. ते मधल्या काळात मशिदीत गेले होते, मुस्लिम यांच्यासोबत बोलले तेव्हा ते राष्ट्रीय कार्य सुरू आहे. आम्ही काॅंग्रेस सोबत गेलो तर हिदुंत्व सोडलं.
22) तोतया बाळासाहेबांचे चेहरे लावून शिवसेना पळवायला आलेले आहेत.