राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

0
81
Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत चाचणी पूर्ण करायला सांगितले आहे. त्याविरोधात ठाकरे सरकार सर्वोच न्यायालयात गेलं असून बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेचे मुख्य प्रदोत सुनील प्रभू यांनी हि याचिका दाखल केली आहे

शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून अद्याप हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलांबीत आहे. अशा वेळी बहुमत सिद्ध करायला लावणे अवैध आहे. तसेच या बहुमत चाचणीसाठी केवळ एक दिवसाचा वेळ दिला आहे. हा वेळ अपुरा आहे. सर्व आमदारांना पोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ या दरम्यान सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं लाइव्ह टेलिकास्ट केलं जावं आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था उपलब्ध केली जावी. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मतमोजणी शिरगणती पद्धतीनं घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभं राहून त्याची गणती केली जावी आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here