शिवसेनेचे विधानभवन कार्यालय सील; नेमका आदेश कोणाचा??

eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने विधिमंडल कार्यालय बंद केलं आहे. शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. पण, शिंदे गटाकडून कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेनं हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा आहे.

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर बहुमत चाचणी पार पडेल.महाविकास आघाडी कडून राजन साळवी आणि भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदारांचे संख्याबळ पाहता शिंदे गटामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आजच्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे.