शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरुपातही मिळणार; मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्य सरकारने कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. हाताला काम नसल्याने यामुळे अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यापार्श्वभुमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. पार्सल सुविधेत शिवभोजन थाळीच्या किमतीत कोणताही बदल नाही असं ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, आपल्या नजीकचे शिवभोजन केंद्र शोधण्यासाठी शासनाकडून एक यादी देण्यात आली आहे. आता तुम्हीही तुमच्याजवळील शिवभोजन केंद्र आॅनलाईन पद्धतीने शोधू शकता. त्यासाठीची लिंक https://t.co/mQLrLzjTEK अशी आहे. कोरोना काळात हाॅटेलमध्ये गर्दी होऊ नये याकरता शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.