सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा नगरपालिकेची निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. त्यानंतर आता आमदार शिवेंद्रराजेंनीही प्रत्युत्तर दिले आहे. “मला काही हौस नाही मी जमिनीवरचा माणूस आहे. आणि मला जमिनीवरच राहण्याची इच्छा आहे,” असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले आहे.
आज सकाळी उदयनराजे भोसले यांनी टीका केल्यानंतर त्याच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नुकत्याच सातारा येथील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी बुलेटवर बसून हवेतून स्टेजवर एंट्री केली होती. त्यावर मी म्हटलं होत की वाऱ्यावरची वरात आहे ही. वाढदिवसानिमित्त त्यांचे कामच तसे असते आणि त्यांना सांगा.
माझी काळजी करू नका, मी वेळेवर व्यायाम करतो त्यामुळे माझे पोट सुटणार नाही. आणि ठीक आहे ते उंच असतील किंवा त्यांची उंची फार असेल पण जे काही आहे. ते सारखे वाऱ्यावरच असतात. मी जमिनीवर राहतो का तर सर्व सातारकर जमिनीवर राहतात त्यामुळं मी त्यांच्यात राहणारा लोकप्रतिनिधी आहे. मला खूप छान झोप लागते मला कळालं नाही की हे त्यांना कुठून कळाले की मला झोप लागत नाही मी निवांत झोपतो. झोप उडवण्यापेक्षा पाच वर्षाचा त्यांचा जो कारभार आहे त्यांनी सातारकरांची झोप उडवली आहे.
ज्यावेळी निवडणूक समोर येईल त्यावेळी सातारकरच गेल्या पाच वर्षांमध्ये जे काय पाहिला आहे. त्यामुळे सातारकर यांची झोप उडाली आहे. सातारकरांचा पैसा तुम्ही लुटून खाल्लेला आहे. कुठलीही यामध्ये सातारा म्हणून सरकारकडून आलेले अनुदान तुम्ही मला कोठेही यातील एक गोष्ट दाखवा. यात काहीतरी नवीन सातारा नावाला शोभेल, असा मोठा एखादा प्रकल्प नगरपालिकेच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी कोणतीही गोष्ट केली नाही यांनी फक्त गल्लीबोळात त्यांचे बगलबच्चे वाढावेत म्हणून रस्ते गटारी केले, अशी टीका शिवेंद्रराजेनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही – शिवेंद्रराजे भोसले
यावेळी शिवेंद्रराजे यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल वक्तव्य करताना कोणीही थोडी जबाबदारीने करावेत. त्या वक्तव्याचे नंतर काय परिणाम होतील याचा विचार करावा. छत्रपतींची तुलना हि कोणाशीही होऊ शकत नाही. त्याच्यावर राजमाता जिजाऊंनी संस्कार केले आहेत, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले.
जिल्हा बँकेत उदयनराजे ड्रायव्हरच्या मुलाची बदलीसाठी येतात
यावेळी शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. “डीसीसी बँकेच्या निवडणुकीनंतर छत्रपती उदयनराजे हे जिल्हा बँकेच्या कारभारावर एक फार मोठ्या पूरग्रामीण विषयावर चर्चा करण्यासाठी येणार आहेत, असे मला कळाले. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा बँकेत न येता आपल्या ड्रायव्हरच्या मुलाची बदली करण्यासाठी ते तिथं जिल्हा बँकेत चेअरमनला आणि सदस्यांना बोर्ड मीटिंगमध्ये भेटण्यासाठी आले. पण डायरेक्टर मिटींगला येत नाही पण ड्रायव्हरच्या मुलाची बदलीसाठी येतात यातूनच त्यांचं जिल्हा बँकेत मधील प्रेम आणि शेतकऱ्यांवरच प्रेम हे दिसत आहेत,” असा टोला भोसले यांनी लगावला.