सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला. या महायज्ञाच्या पूजनासाठी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसले यांच्यासह उपस्थिती लावली होती.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज वाढदिवसाच्या निमित्ताने जो शिवपंचायतन महायज्ञ उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामागचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशात सर्व ठप्प होते. सर्वांच्या मनात भीती होती कि पुढे काय होणार? तसेच रशिया आणि युक्रेनच्या लढाईचाही आपल्यावर परिणाम झाला आहे.
त्याचा परिणाम आज मोठ्या प्रमाणात महागाई वाढू लागली आहे. अशात हिंदू संस्कृतीत आपल्याला जे काही शिकवलेले आहे. त्यानुसार आज हा महायज्ञ आयोजित करण्यात आला. एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझी भावना होती कि एक वाढदिवस साजरा न करता समाजासाठी काहीतरी आपण करावे या भावनेतून आपण शिवपंचायतन महायज्ञ उपक्रम घेतलेला आहे, असे भोसले यांनी सांगितले.