माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार; थेट आरोप करत शशिकांत शिंदेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शिंदेंचा गेम केला अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकही केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत तुमची नेमकी काय भूमिका असणार असा उलट सवाल जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना केला.

विधानसभा निवडणुकीत जसा शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला याची ही दुसरी पायरी आहे का याचा विचार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करावा. पक्षविरहित पॅनल असताना मी पडलो, पक्षासाठी पाटण मध्ये लक्ष घातले होते त्यामुळेशंभूराजे देसाई माझ्यावर नाराज झाले… पक्षाने आदेश दिला, मी मान खटाव मध्ये लक्ष घातले ही माझी चूक झाली का? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला.

बँकेच्या निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्या विरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिलय. शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश का केलं नाही, कारण त्यांनी मनापासून केलंच नाही, असा थेट आरोप शशिकांत शिंदे यांनी भाजप आमदार व सहकार पॅनलचे सहकारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केलाय.

मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पण ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला, त्यांना तुम्ही बिनविरोध पॅनल मध्ये घेतलं. आणि माझ्यासारख्या माणसाने तुमच्याशी 5 वर्षात चांगले संबंध ठेऊन तुम्ही मला जिल्हा बँकेत येऊ न देण्याचे काम केलं हे हे बरोबर नाही असे शिंदे यांनी म्हंटल.

जिल्ह्यातील नेत्याना माझी हीच विनंती आहे की आपण आता निर्णय घ्यायचा आहे…आगामी जिल्हा परिषद पंचायत निवडणूक मध्ये काय करायचं याची पॉलिसी आत्ताच करा….त्यावेळी जिल्हा बँकेचे पुनरावृत्ती व्हायला नको…. सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे..त्यामुळे योग्य भूमिका ठरवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला भरभरून दिलं आहे. पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करणार आहे..शरद पवार साहेबांच्या आणि पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन मी काम करणार नाही, सद्यपरिस्थिती पक्षानेही हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

You might also like