Satara News : अजिंक्यतारावर रोप वेचे काम लवकरात लवकर सुरू करणार; शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraj Bhosale Ajinkyatara Fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मराठ्यांची राजधानी असलेली सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याला आमदार फंडातून 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी रोप वे करण्यात येणार असून याचा उपयोग सातारा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी होणार आहे. या रोपवेचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले.

आ. शिवेंद्रराजेंनी आज अजिंक्यतारा किल्ल्यास भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आता आमदार शिवेंद्रराजेंनी रोप वे लवकर होण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.

अजिंक्यतारा किल्ल्यावर रोप वे सुरु करण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. दि. 27 जुलै 2022 रोजी नवी दिल्लीत तत्कालीन भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. तसेच मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथे केंद्र सरकार च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत सकारात्मक चर्चा केली होती.

अजिंक्यतारा किल्ल्यावर 92 कोटींचा केबल रोप- वे उभारण्यात येणार : छ. उदयनराजे

या कामासाठी एकूण 92 कोटी रुपयांच्या या केबल रोप-वेच्या प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र आता आ. शिवेंद्रराजेंकडून रोपवेच्या कामाची पाहणी करण्यात आली असल्याने यावरून श्रेय वादाला तोंड फुटणार आहे. भाजपाचे आमदार आणि खासदार पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येणार हे नक्की.