मुंबई | आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठे नुकसान होणार असल्याची माहिती भाजपच्या पक्षाअंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेना युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्व्हेतून मिळविलेल्या माहितीनुसार येत्या निवडणुकींमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षातून निवडून आलेले खासदार मोठ्या प्रमाणातून केंद्रात जातील. युती झाली नाही तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीतील खासदारांना त्याचा मोठा फायदा होईल .
दरम्यान भाजपच्या सर्व्हेत भाजपची -शिवसेनेशी हातमिळवणी झाल्यास 30 ते 34 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 18 ते 20 जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करता येईल. जर भाजपने निवडणूक स्वबळावर लढली तर भाजपला केवळ 15 ते 18 जागांवर तर शिवसेनेला 8 ते 10 जागांवर समाधान मानावं लागेल. तर या उलट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 22 ते 28 जागा मिळू शकतात, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.