कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज कोल्हापूरमध्ये टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजात आज शिवजयंती साजरी करण्यात आली.
ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी छत्रपति शाहू महाराज यांच्या हस्ते अणि युवराज यशराज यांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रोमांचित झाले
श्रीमंत छत्रपति शाहू महाराज आणि युवराज यशराज यांचं पारंपारिक पद्धतीने स्वागत कोल्हापूरकरांनी केले. कोल्हापूरातील टाऊन हॉल शेजारील नर्सरी बागेत शाहू महाराजानी शिवरायांचे अत्यंत देखने मंदिर बांधले आहे. काळ्या दगडात बांधकाम केलेले हे मंदिर दुमजली आहे. संस्थान काळात येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात होती. शिवजयंती दिवशी शाही लवाजम्यासह शिवरायांची पालखी निघत असे. पालखीला राजर्षि शाहू स्वतः खांदा देत. या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.
आजही ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आज सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराज आणि यशराज हे शाही लवाजम्यासह नर्सरी बागेतील या शिवमंदिर येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती घराण्याचे स्वागत केले त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी यावेळी विद्यार्थी कोल्हापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.