हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. तर बेळगावात शिवप्रेमींकडून कानडी व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यात आली.
या घटनेचे पडसात कोल्हापूरही उमटले. कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बेळगावत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत कर्नाटकचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घटनेनंतर बेळगावमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
घटनेबाबत सांगायचे झाले तर बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी संतापले असून कोल्हापुरातील वातावरण सध्या तणावाचे आहे.