कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करु, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन दिली.

६ जून रोजीदेशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी कशाचीही पर्वा न करता दरवर्षी किल्ले रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी.दरवर्षी ६ जूनला हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवप्रेमी गडावर येत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे यंदाच्या वर्षी एकही सण साजरा करता आलेला नाही. त्यामुळे किल्ले रायगडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक सोहळा तोच जोश, तोच उत्साह, तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून असं आवाहन केलं होत. छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवप्रेमी आज रायगडावर जमले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment