सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील औट्रम घाट बोगद्याला मिळणार गती, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील औट्रम घाट बोगद्याला गती द्या, या मागणीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली चाळीसगाव घाटात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्राकडे व लोकसभेत प्रश्न उपस्थित करत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

गल्ले बोरगाव – देवगाव फाटा येथे सर्विस रोड करावा, कसाबखेड – शिवूर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती सूचना यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिली.यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (२११) सोलापूर धुळे रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्य घातले आहे.

पाहणी दरम्यान महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता यू. जे. चांभारगोरे, प्रकल्प संचालक अविनाश काळे, महेश पाटील, देवतकर, तहसीलदार, संघर्ष समिती अध्यक्ष तथा शिवसेना तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके, राजू राठोड, डॉ. एस. जे. जाधव, डॉ. सदाशिव पाटील, सोपान गोलाईत, विजय बारगळ आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कन्नड बायपास आणि अंधानेर या धोकादायक जागेची स्थळ पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान महामार्गावरील समस्या चाळीसगाव औट्रम घाट बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महामार्ग ग्रस्त गावकऱ्यांचे एक लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment