Shivrayancha Chhava : सज्ज व्हा!! ‘शिवरायांचा छावा’ येतोय..; ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivrayancha Chhava) मराठी सिनेविश्वातील ‘श्री शिवराज अष्टक’ची निर्मिती करून तरुणांना इतिहासाचे भव्य दर्शन घडवणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार..? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava Official Trailer | Digpal Lanjekar | Chinmay Mandlekar, Bhushan

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आगामी ऐतिहासिक कलाकृती ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. (Shivrayancha Chhava) सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘श्री शंभोः शिवजातस्य, मुद्रा द्यौरीव राजते। यदंकसेविनी लेखा, वर्तते कस्यनोपरी॥ चला अनुभवूया छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारे ”शिवरायांचा छावा”चे लघुदर्शन अर्थात ट्रेलर!’ सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे.

उभ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची हि गोष्ट रुपेरी पडद्यावर झळकणार अशी घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता पहायला मिळाली. टेलर रिलीजनंतर हि उत्सुकता आणखीच वाढली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होतं. (Shivrayancha Chhava) ज्यांनी स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हाती घेऊन गाजविलेले पराक्रम आजही अंगावर काटा आणतात. त्यामुळे या सामान्य वाटणाऱ्या असामान्य महान योद्धयाचा इतिहास दिग्पाल लांजेकर यांनी रुपेरी पडद्यावर आणला आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा उत्कंठावर्धक भव्य ऐतिहासिक चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती (Shivrayancha Chhava)

‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर ढोल- ताशांच्या गजरात लॉंच करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण पाटीलने महाराजांच्या वेशात एंट्री करत सर्वांना भारावून टाकले. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे सादरीकरण आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष सुरु असलेल्या उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे केवळ २४ तासांतच हा ट्रेलर सोशल मीडिया ट्रेंडिंगच्या तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावरून प्रेक्षकांनी ट्रेलर इतका डोक्यावर घेतला आहे तर चित्रपटाला किती पसंती मिळेल याचा अंदाज येतो आहे.

चित्रपटात ‘हे’ कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

(Shivrayancha Chhava) या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे अशी तगडी स्टारकास्ट आपल्या भेटीसाठी सज्ज आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गाणी आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरांनी सांभाळली आहे.