SIP Investment : SIP गुंतवणुकीचे प्रमाण वाढलं; डिमॅट खाते काढणाऱ्यांची संख्याही जास्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SIP Investment : सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यात आपल्याला पैशाची चिंता सतावू नये यासाठी आपण कमाईतील काही रक्कमेची गुंतवणूक करतो. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत जस कि बँकेत FD च्या रूपाने कोणी पैशाची गुंतवणूक करतो, कोणी सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी काहीजण कोणी पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे ठेवतात. आजकाल लोकांचा म्युच्युअल फंडवर (Mutual Fund) सुद्धा विश्वास आहे, कारण म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीतुन तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मिळणाऱ्या परताव्या पेक्षाही जास्त रिटर्न मिळतो. सध्या शेअर बाजारात कितीही चढ-उतार पाहायला मिळाले तरी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन म्हणजेच SIP या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे.

देशातील भक्कम आर्थिक मूलभूत तत्त्वे, उत्तम कॉर्पोरेट नफा, राजकीय स्थिरता आणि महागाईतील संयम यासारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे गुंतवणूकदारांचा भारतीय इक्विटींवर विश्वास कायम आहे. यः विश्वासाच्या जोरावर SIP सारख्या फुच्युअल फंडात पैशाची गुंतवणूक करायला गुंतवणूकदार मागेपुढे पाहत नाहीत. देशात वेगवेगळ्या बँकानुसार SIP चे वेगवेगळे फंड आहेत, या सर्व फंडात गुंतवणूकदारांनी हजारो कोटींची गुंतवणूक (SIP Investment) केलेली आहे.

SIP करणाऱ्यांची संख्या किती वाढली – SIP Investment

जानेवारी २०२४ मध्ये 51.84 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी SIP सुरू केली, डिसेम्बर महिन्यात हाच आकडा 40.33 लाख होता म्हणजेच यामध्ये 28.5 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. वार्षिक आकडेवारी बघितली तर SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण 128.9% नी वाढलं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये एकूण एसआयपी खात्यांची संख्या ७.६४ दशलक्ष रुपयांवरून ७.९२ दशलक्ष रुपये झाली. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2.66 दशलक्ष आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2.51 दशलक्ष SIP ची नोंदणी झाली होती.

एकीकडे एसआयपी खात्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असताना दुसरीकडे गुंतवणूकदार शेअर बाजारात सुद्धा आपला पैसा गुंतवत आहेत. शेअर बाजारात पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांची डीमॅट खाती उघडली आहेत. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (CDSL) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये 46.84 लाख डिमॅट खाती उघडण्यात आली, तर हाच आकडा डिसेंबर 2023 मध्ये 40.94 लाख इतका होता. देशात एकूण डिमॅट अकाउंटची संख्या 14.39 दशलक्ष झाली आहे.