टीम हॅलो महाराष्ट्र । संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात ‘सवांद तरुणाईशी’ कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमात धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
दरम्यान, अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळवत आदित्य ठाकरे यांची अभिनेत्री दिशा पटानी बरोबर असलेल्या मैत्रीवरून त्यांची पाय खेचण्याचा प्रयत्न केला. अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाचा प्रश्न विचारात रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची ? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको पटनी चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला.
यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं. “आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे.” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यावर धीरज देशमुख यांनी आपण ते एलिजेबल आणि अनव्हेलेबल असल्याचं सांगत आहोत असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.