मुंबई प्रतिनिधी। ‘अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. बाबरी मस्जिद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर ते गर्वाचे असल्याचे एकाच वाघाने म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिरचा मुद्दा शिवसेनेने नेहमीच जीवंत ठेवलाय. अयोध्येत राम मंदिर होणार, असे सांगत काहींनी पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली.’ असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की,’राम मंदिराबाबतचा उद्धव ठाकरे यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राम मंदिराचा खटला निकाली लागला असून, राम मंदिर बनवण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश सरकारला आज कोर्टाने दिले. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा सुद्धा या आदेशात समावेश आहे.त्यामुळे अयोध्येत आता राम मंदिर होणार हे निश्चित झाले आहे. यावरच संजय राऊत यांनी आपली भूमिका यावेळी मांडली आहे.