हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच असे विधान जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हंटल.
फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की, तुमचं त्याने काय बिघडलं असतं? जर अडीच वर्षे त्यांना दिली असती. तुम्हाल कुठली हवी होती पहिली की नंतरची अडच वर्षे? हे माझे त्यांना प्रश्न आहेत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. कारण, मी फाडफाड बोलणार माणूस आहे. मी वरचे आदेश वैगरे सगळं झुगारून देतो असेही ते म्हणाले.
त्यांच्या दोघांत जे काही झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांना फसवून नका तुम्ही. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत. असे विक्रम गोखले यांनी म्हंटल.