औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे यांचे नाव काढताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले.कोण तो अंबादास दानवे.?तो काय माझ्या पेक्षा वरिष्ठ आहे का? त्याचे नाव घेऊन तोंड खराब करत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रस्थापितांना जनता कंटाळली आहे.त्यामुळे यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत चमत्कार होईल आणि शेतकरी सहकार बैंक विकास पॅनल निवडून येईल असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकिसाठी शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेतकरी सहकारी बँक विकास पॅनल ला जाहीर पाठिंबा दिला आहे. खैरे म्हणाले आमदार हरिभाऊ बागडे यांना जिल्ह्यातील बँक, संस्था,कारखाने सर्व काही पाहिजे.मात्र बागडे यांचे आता वय झालं आहे.त्यामुळे त्यांनी आता थांबावं. भारतीय जनता पक्षाच्या नियमानुसार ७० व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवता आली असती तर निवडणुकीची जबाबदारी शिवसेना नेता म्हणून माझ्याकडे असती. गेली ३५ वर्षे काम करतोय. पक्षामध्ये नवीन आले आहेत. त्यांना शिवसेनेची शिस्त, नियमावली देखील माहिती नाही. तर त्यांच्यासाठी मी अनेक बैठका देखील घेणार असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना या वेळी सांगितले.
अंबादास मनकपे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या पंचवीस वर्षांपासून तोट्यात आहे. प्रस्थापित शेतकऱ्यांच्या नावावर बँक चालवतात.मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाही. शासनाच्या योजना आलेल्या असताना त्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी प्रस्थापितांच्या कार्यप्रणालीवर वैतागले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रस्थापितांना बँकेचे फायदे तोटे आज देखील काळात नाही. त्यांनी एवढे दिवस बँका चालवली त्यांनी फायदे तोटे समजून सांगावे.या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील बँका सरस ठरल्या आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group