व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सोमय्या माझ्यासमोर आला तर मी त्याला मारेन; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली आहे. किरीट सोमय्या मला घाबरतो, तो माझ्यासमोर आला की मारीन असे विधान त्यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, मी किरीट सोमय्यांना शक्ती कपूर म्हणतो, कारण तो तसा बोलतो. तो सतत हा हु हा हु करत असतो.सोमय्या माझ्यासमोर आला की मी त्याला मारेन. मी मतांची खंडणी घेतली, पैशांची नाही. माझ्यावर ईडी पडू शकत नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केला

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. सोमय्या यांच्याविरोधात खैरे यांनी तक्रारही केलीय. सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण उठणार नाही, असा पवित्रा खैरे यांनी घेतला होता.

तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलनाने करण्यात आली आहेत . ठाणे, रायगड, नाशिक, परभणी, अहमदनगर, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत शिवसेनेकडून सोमय्यांचा निषेध केला आहे