मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तास्थापनेचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेसनं शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे,अनिल देसाई, दिवाकर रावते,अनिल परब तसेच शिवसेनेचे इतर वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तेव्हा राज्यात स्थापन होणार नवं सरकार शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे असणार याबाबत शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिल्याने शिवसेनेनं सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर शिवसेनेला विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं लागेल. काँग्रेसन ४४ आमदारांच्या सह्यांचं पत्र फॅक्सद्वारे राजभवनाला पाठवलं. त्याचबरोबर काँग्रेसने शिवसेनेला हिरवा कंदील दिल्यानंतर लगोलग राष्ट्रवादीनेसुद्धा ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेसोबत राजभवनाकडे पाठवले. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री आमचाच होणार या आपल्या दाव्याला सत्यात उतरवले आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी केवळ २४ तासांचा अवधी दिला होता. त्यामुळे आज दिवसभर सत्तास्थापनेची टांगती तलवार शिवसेनेवर होती. उद्धव यांनी आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. मात्र शेवटपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्यात चर्चाच सुरू होत्या. अखेर काँग्रेस हायकमांडकडून शिवसेनेला पाठींबा द्यावा हा निर्णय घेण्यात आला. भाजपसोबत युती तोडताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिल्याचा उच्चार केला होता. आता बाळासाहेबांचं हे स्वप्न केवळ काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सत्यात उतरणार आहे आणि आजपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन अध्याय सुरु होणार आहे एवढं मात्र नक्की..!! आता मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडून शपथ कोण घेणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
येऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन@AjitPawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule @PawarSpeaks#hellomaharashtra
https://t.co/2zbsxcKHeq— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019
राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास.. पक्षांतर केलेले घरवापसी करणार का?@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks https://t.co/h8CXIDA8wF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीने केली शिवसेनेच्या वाघाची शिकार! राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार@satyajeettambe @RohitPawarSpeak @NCPspeaks @AjitPawarSpeaks#hellomaharashtra https://t.co/MvTBEasEuX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019