हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेचे प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल केला आहे .
अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले. आपण ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले आहेत. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे!! असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दात किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.