चौकशा करा पण, याद राखा! महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे; राऊतांची भाजपला चेतावनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या देशात दबाव तंत्राचं राजकारण सुरू आहे. त्यामुळेच ईडी मार्फत चौकशा लावल्या जात आहे. जेवढ्या चौकश्या करायच्या त्या करा. आम्ही घाबरत नाही. पण महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांनी दिला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं.

”ज्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल करतानाच व्यवसाय-उद्योग करणाऱ्या मराठी माणसावर चौकशा लावाल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला. चौकशीला कुणीही घाबरत नाही. आता तुम्ही घाबरा. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत,” असा इशारा राऊत यांनी दिला.

नोटीशीची वाट पाहतोय
मला अजून नोटीस आली नाही. मला कधी नोटीस येते याची मी वाट पाहतो. सध्या व्होकल होणं आणि सत्य बोलणं गुन्हा ठरत आहे. त्यामुळे मला आणि अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीची (ED) नोटीस आली तर मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही, असं सांगतानाच केंद्र सरकारने आता 20 ते 25 वर्षांपूर्वीची जुनी थडगी उकरून काढण्याचं काम सुरू केलं आहे. त्यांचे हात मोहोजदडो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या चौकश्या करा. तुम्ही कितीही धाडी घाला. कितीही खोटी कागदपत्रं तयार करा. अशा चौकश्यांना आम्ही घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

पत्ते तुम्ही पिसताय, आम्ही डाव उलटवू
सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे. दबावतंत्राचं राजकारण सुरू आहे. आता तुम्ही पत्ते पिसताय पण लक्षात ठेवा डाव आम्ही जिंकू, असा इशाराही त्यांनी दिला.

120 नेत्यांची यादी देतो, मग करा चौकशा
राऊतांनी भाजपच्या 100 नेत्यांची यादी ईडीला द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या सर्व चौकश्या पूर्ण होऊ द्या. शंभरच काय 120 नेत्यांची यादी देतो. ईडी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे ही यादी पाठवतो. मग बघतो ईडी कुणाला चौकशीला बोलावते, असा पलटवारही त्यांनी केला. (shivsena leader sanjay raut slams bjp over ed enquiry)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment