राज ठाकरेंना डोंबाऱ्याच्या खेळातील माकडाची उपमा; शिवसेनेची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगला आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावरून शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना नेतेही राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. राज ठाकरेंना डोंबाऱ्याच्या खेळातील माकडाची उपमा देत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. औरंगाबादमधील तापडिया नाट्य मंदिरात शिवसैनिक प्रशिक्षण शिबीरावेळी त्या बोलत होत्या.

मनीषा कायंदे म्हणाल्या, काही लोकांना आता काहीच विषय राहिलेला नाही. त्यामुळे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते काहीही करत आहेत. राज ठाकरे हे डोंबाऱ्याच्या खेळातील माकड असून या माकडाला नाचवणारे डोंबारी कोण आहे हे जनतेला कळून चुकलं आहे. अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेवरून टीका केली आहे. भाजपने मनसेची सभा स्पॉन्सर केली असून राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेनं पैसे देऊन लोकं आणल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सभेला 5 लाख लोक आले तरी फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

Leave a Comment