हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद काही नवा नाही. आता अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडलं आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जनाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
तसेच राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे.भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेशी गद्दारी केल्यानेच भाजप सत्तेबाहेर आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणाले. पण ते आलेच नाही. मी मात्र शिवसैनिक म्हणून नक्कीच येणार, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला तरच शिवसेनेची ताकद दिसून येईल, असं सांगतानाच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’