औरंगाबाद प्रतिनिधी | भाजपची मुंबईत एक बैठक झाली. आणि त्या बैठकीत शिवसेनेला विविध मुद्यांवरून घेणार्याची चर्चा झाली. मात्र शिवसेनेला घेरणारा अजून जन्माला यायचा आहे. हे भाजपने लक्षात ठेवावे असे मत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 32 वर्षात शिवसेनेनं अनेक कामे केली आहेत. हे जनतेच्या लक्षात आहे. अस मतही त्यांनी व्यक्त केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे औरंगाबाद शहर फुलल आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे इथली शिवसेना मजबूत झाली असून शिवसेनेला घेरण्याची शक्ती कोणीही दाखवू शकत नाही. ज्या ज्या वेळी हिंदुत्त्वाला अडीअडचणी निर्माण झाल्या त्या त्या वेळी शिवसेना आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरली आहे हे शिवसेनेने संभाजीनगरला वारंवार दाखवून दिले आहे.
औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला शिवसेना 32 वर्षा पासून लढा देत आहे. नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना कायम आग्रही आहे. विमानतळ नामकरणा साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाने प्रस्ताव करून केंद्राकडे पाठवला होता. पण याबद्दल भारतीय जनता पक्षाला अजूनही जाग येत नाही.
विकासाचा मुद्दा घेतला तर मागील 32वर्षा पासून संभाजीनगर हे आशिया खंडातील वेगाने वाढणार शहर आहे. अडीच लाख कामगार येथील उद्योगावर जगतोय. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना येतेय. या शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असेल , डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर असेल, प्राणी संग्रहालय असेल अशी अनेक कामे शिवसेनेने संभाजीनगर मध्ये केली आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर देखील कोणाला तोंड उघडता येणार नाही . हे शहर सुपर संभाजीनगर करण्याचा विडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने उचलला आहे. कुणी घेरण्याचा प्रयत्न केल्यास त्यास आम्ही पाणी पाजनार असा इशारा देखील त्यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’