औरंगाबाद की संभाजीनगर ?? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका ; म्हणाले की …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. औरंगाबादच्या नामकरण संभाजीनगर करण्याला शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले

औरंगाबाद की संभाजीनगर? अजित पवार म्हणतात...Ajit Pawar | Aurangabad | Sambhajinagar

वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पवारांना विचारले असता, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढत असतात. कुणी विकासाबद्दल बोलत असतात तर कुणी नामकराणाचे मुद्दे काढत असतात. राज्यात गेल्या 60 वर्षात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोण औरंगाबादबद्दल बोलतंय, कोण नगरबद्दल तर कोण पुण्याबद्दल बोलतंय. प्रत्येकाला आपली मागणी रेटण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

अधिकाराचा वापर कसा करायचा याचा निर्णय ज्याचा त्याने चिंतन करून घ्यायचा असतो, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विकासावर भर दिला आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करत असतो, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment