एकनाथ खडसेंपासून माझ्या जीवाला धोका; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ

Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असे त्यांनी म्हंटल.

राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या पासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून याच अशाच प्रकारच्या कट कारस्थानं मधून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ,आणि अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार असल्याचा गंभीर चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण-

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसेंनी महिलांची छेडखानी करणाऱ्यांना चोपच नाहीतर तर त्यांचे हात तोडून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर शनिवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे.