हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. इतर राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अस आवाहनही जनतेतून व्यक्त होत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाबद्दल विनंती केली आहे.
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील निर्भयाचा अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना मी विनंती करतो.
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 2, 2020
काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमधील पाटनामध्ये पोलीस तक्रार दाखल करून बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचले होते. एवढंच नाहीतर या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती. आता शिवसेनाही भाजपला शह देण्याची एकही संधी सोडत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’