हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात लोकशाही आहे. त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या औरंगाबाद येथील आयोजित सभेवरून निशाणा साधला आहे. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांना सुनावलं आहे.
संजय राऊत म्हणाले, मराठीवाड्यातील जनता खासकरुन औरंगाबादमधील जनता नेहमीच शिवसेनेला पाठिंबा देत आली आहे. कोणालाही जर तिथे सभा घ्यायची असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशात लोकशाही आहे. त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. कोणी जर बाळासाहेबांची कॉपी करत असेल, तर तुम्ही काय करु शकता. जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या. अस म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.
शिवसेनेना नेहमी अयोध्येत गेली आहे. हा केवळ निवडणुकीचा भाग नाही. आमचं अयोध्येशी नातं आहे. जेव्हापासून अयोध्येचं प्रकरण सुरू झालं तेव्हापासून शिवसेना आणि अयोध्येच भावनिक नातं आहे. श्रद्धेचं आहे. जेव्हा सरकार नव्हतं, तेव्हाही आम्ही जात होतो. महाराष्ट्रात सरकार झाल्यावर मुख्यमंत्री दोनदा अयोध्येला गेले आहेत. आमचं मन साफ आहे. आम्ही राजकीय फायद्यासाठी करत नाही. ज्याला कुणाला अयोध्येला जायचं जाऊ द्या. त्यांनी स्वच्छ मनाने जावं. राजकीय भावनेने जाऊ नका. राजकीय भावनेने जाणाऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.