रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नसतं; राऊतांचा सुभाष साबनेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना सोडताना त्यांच्या डोळ्यातुन अश्रू आले होते. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साबनेंवर निशाणा साधला आहे. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नसतं असे संजय राऊत यांनी म्हंटल.

भाजपाकडे स्वतःचे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला तोही रडका. शिवसैनिक हा परिस्थितीच्या विरुद्ध रडत नाही लढतो. रडणाऱ्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पण भाजपाने हे काही नविन धोरण सुरु केलं आहे स्वतःचे काही नसल्यामुळे दुसऱ्यांची लोक घ्यायचे. हे फार काळ चालत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना सोडताना सुभाष साबणे याना अश्रू अनावर झाले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करतोय अस ते म्हणाले होते. “मी आजही शिवसैनिक आहे. ४ ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला असे ते म्हणाले.