‘ये दोस्ती..हम नही तोडेंगे..’ म्हणत संजय राऊतांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, ” ये दोस्ती..हम नही तोडेंगे..आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडण्यात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. भाजपने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरली. भाजपने अनेक मार्गांनी शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा प्रत्येक वार पलवटून लावला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकासआघाडी प्रत्यक्षात आकार घेण्यास पुरेसा कालावधी मिळाला. यानंतरही संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”