हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत देशातील राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातील राजकारण यावर चर्चा झाली असून राहुल गांधी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल.
राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले.” असं संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
श्री. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी
जाणून घेतले.— Sanjay Raut (@rautsanjay61) August 2, 2021
राहुल गांधी दोन वर्षांत महाराष्ट्रात आलेले नाहीत. ते लवकरच राज्यात येणार आहेत. त्यांनी मला राज्यातील राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याबद्दल मी त्यांना माहिती दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल त्यांना कुतूहल आहे. त्यांनी इतकी मोठी संघटना कशी उभी केली, ती कशी चालवली याबद्दलची माहिती राहुल यांनी जाणून घेतली,’ असं राऊत यांनी सांगितलं.