फालतू गप्पा मारू नका, बेळगाव महाराष्ट्राचा आहे की नाही एवढेच सांगा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

raut fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर शिवसेना- भाजपमध्ये राजकीय जुगलबंदी वाढली आहे. बेळगाव मध्ये मराठी माणसाचा नव्हे तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावल्यानंतर संजय राऊतांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव हा महाराष्ट्राचा आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार आहे ते नंतर बघू. बेळगावात मराठी एकजुटीचा विजय झालाच पाहिजे असे बोलणे म्हणजे अहंकार आहे की ती मराठी अस्मिता आहे हे राज्यातील ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या.

फडणवीस नेमकं काय म्हणाले-

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झाला नसून संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटल होत.