तुम्ही खणलेल्या खड्ड्यात एके दिवशी तुम्हीदेखील पडू शकता; राऊतांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या नेत्यांना सध्या ईडीला सामोरे जावे लागत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारावर आहेत. दरम्यान याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना खचणार नाही. केंद्रानं चौकशी कराव्यात, यंत्रणांच्या मदतीनं खणत राहावं. पण तुम्ही खणलेल्या खड्ड्यात एके दिवशी तुम्हीदेखील पडू शकता, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, सूडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण यातून हे सगळं सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला आहे. तसंच कर नाही त्याला डर कशाला? आम्ही काहीही असेल तरी चौकशीला सामोरे जाऊ, असंही ते म्हणाले आहेत.

You might also like