संजय राऊतांनी व्यंगचित्र ट्वीट करत साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. ईडी च्या छापेमारीनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजप सूडबुद्धीने हे सर्व करत आहे असा आरोप त्यानी केला होता. आता नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहे. यातील एका कुत्र्यावर सीबीआय, तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है… असे लिहिले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांनी तासाभरापूर्वी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

हे व्यंगचित्र ज्यांना समजलं, ते त्या भावनेनं घेतील, ज्यांना ते समजलेले नाही, ते अधिक सूड भावनेने वागतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment