हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. गेली दोन वर्ष तर कोरोनामध्येच गेली. पण आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की नेहरुंपासून ते अगदी मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देश काँग्रसेच्याच पुण्याईवर चालतोय. काँग्रेसनं राबवलेल्या योजना आजही आपण पाहत आहोत. त्यामुळे मोदी सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि आणखी मेहनत घेण्याची गरज आहे.
देशात आजही महागाई, बेरोजगारी आहे. करोनानंतर पसरलेली अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. प्रत्येकाला अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं नाही. फक्त रोजगार, रोजी रोटी मिळायला हवी. सात वर्षात देशातील जनतेला हे मिळालं का याचं चिंतन करायला हवं,” असा सल्ला संजय राऊतांनी मोदी सरकारला दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.