विरोधकांनी ‘त्या’ घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र विरोधकांना फटकारले आहे. विरोधकांनी या घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं अस संजय राऊत यांनी म्हंटल.

या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, कारण अशा प्रकारच्या घटना या राज्याला मान खाली घालायला लावतात. महिलेचा जबाब पोलिसांना नोंदवता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या तरीही पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडलं आहे,” असे संजय राऊत यांनी म्हंटल.

आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. या घटनेची तुलना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही, शेवटी एका महिलेने आपला जीव यात गमावला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारला अधिक कठोर पावलं उचलावी लागतील आणि ती उचलल्याशिवाय राहणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment