मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut slams bjp over bihar election result)
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळालं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती. यावरून भाजप आता शिवसेनेला टार्गेट करत आहे.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in