हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता राज्य सरकार कडून राज्यपालांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणं हा घटनेचा भंग आहे. घटनेनं त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत पुढे म्हणाले, हायकोर्टाने जे राज्यपालांना विचारले ते आम्ही सरकार म्हणून कितीतरी दिवसांपासून विचारतोय. मात्र, राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणं हे घटनाविरोधी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.