अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, संजय राऊत कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीचा ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत मात्र खेडमधील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्या कडून घाणेरडे राजकारण सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालू असा सल्ला त्यांनी दिला आहे. खेड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते

खेड पंचायत समितीचा वाद वरिष्ठांपर्यंत

खेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा वाद अखेर आता वरिष्ठांपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता वरिष्ठांपर्यंत पोहोचला आहे या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला आहे.

…. तर याला माज असं म्हणतात

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, लोक फोडून सत्ता स्थापन करायची हे खेडमध्ये घडले पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांना घाणेरडे राजकारण केलं. खेडचा विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत, पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहे ते परंपरेला धरून नाही, अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या आमिषाने पळवून नेलं. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांनी विचार करावा

दरम्यान संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते यांना सरळ सरळ इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं की आमदार दिलीप मोहिते यांच्या वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळेस महाविकासआघाडी राहू अगर न राहू शिवसेनेचा आमदार येणार. तसेच महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असं खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालक मंत्री यांनी विचार करावा असंही राऊत यांनी यावेळी म्हटले.

भांड्याला भांडं लागणारच, पण समन्वय साधा

सरकारमधील पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. खेडमध्ये मात्र वारंवार घटना घडत आहेत दोन-तीन पक्ष असल्याने भांड्याला भांड लागतं अलिखित करार एकमेकांची माणसं सोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही. असं असेल तर दोन पक्षांनी माहिती देऊन समन्वय साधावा असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.