हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली येथील एका कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोश्यारी यांनी उत्तराखंडला परत जाण्याचं मिश्किल भाष्य केलं होतं. त्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात सहभागी होणार का अशी चर्चा रंगली होती. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, राज्यपाल काही बोलले असतील तर मला तुमच्याकडूनच कळतंय. पण ते राज्यात चांगले रमले होते. राजभवनात रमले होते. अनेक काम करताना ते पक्ष कार्यही चांगलं करत होते. त्यांचं आणि इथल्या भाजपाचं चांगलं जुळलं होतं. जायचं असेल तर जाता जाता १२ आमदारांच्या फाइलवर सही करुन जा. थोडं पुण्य आपल्या पदरी (पडेल),” असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते-
सांगली येथील कार्यक्रमात कोशारी म्हणाले, कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह, तू जेव्हापासून आलाय, तेव्हापासून इथे दुष्काळ तर पडला नाही, पण तिथे डोंगराळ भागातही (उत्तराखंड) पाऊसच होता आणि आता इथेही पाऊसच पडतोय, अतिवृष्टी होतेय. आता यासाठी काय करावं?” मी इथे आल्यापासून पाऊस, अतिवृष्टी व्हायला लागली. जर हे जयंतजींना वाटतंय, तर मी लवकरात लवकर इथून सोडून निघून जाईन. कारण त्यांना नुकसान झाल्याचं ते सांगतायत. असंच तर नुकसान नसेल झालं ना पाटील साहेब?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.