“आ देखे जरा किसमे कितना है दम”; संजय राऊतांचा सूचक इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा लोकप्रिय गाण्याचा ओळी शेअर करत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी ईडीकडे

पीएमसी बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडी ही चौकशी करत आहे. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर २०१९ ला ईडीकडे ही चौकशी देण्यात आली होती. पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते.

दरम्यान, 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीची नोटीस आली होती. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment