हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांच्या आणि जगाच्या गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचे आजारामुळे निधन झालेले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य संगीताला समर्पित केलं होतं. देश आणि देवावर निष्ठा त्याचबरोबर माणुसकी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड परिश्रम, कामावर असणारी निष्ठा आणि सहृदय व्यक्तित्व असा अभूतपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये झाला होता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच शिवसेना यांच्याशी त्यांचे स्नेहाचे, प्रेमाचे आणि घरगुती स्नेहाचे संबंध होते.असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्राच्या गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांनी लक्षावधी लोकांच्या बरोबर गानयज्ञामघ्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये समारंभात त्या सहभागी झाल्या होत्या.
मा.लताताईंनी शेवटपर्यंत त्यांचं काम संगीताच्या संदर्भात चालू ठेवलेलं होतं. अनेक सामाजिक विषयांवरती त्यांचं लक्ष होतं, बांधीलकी होती. दीनानाथ मंगेशकर इस्पितळ उभारण्यात सर्वच मंगेशकर कुटुंबियांचा कायम सिंहाचा वाटा राहिला त्याच्यामार्फत सेवा केली जाते आहे. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. विधानपरिषदेची उपसभापती, शिवसेनेचे उपनेते यानात्याने जगामधला सर्वोच्च स्थान भूषवलेल्या एक महान गायिका त्याचबरोबर महाराष्ट्र कन्या, भारतकन्या अशा लतादीदी मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते.