हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे असा सल्ला देखील दिला आहे.
काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा राज्यांतील नेते घेत आहेत. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात काँग्रेस किया गांधी कुटुंबाच्याच नावावर हे नेते निवडणुका जिंकतात, सत्तेवर येतात व सत्तेवर येत हे सर्व माझ्यामुळेच झाले अशी चिंग मारतात. या डिंगवाजीस पंजाबात तडा गेला आहे. सोनिया गांधींचा जो आदेश असेल तो मानू, असे के. अमरिंदर यांना जाहीर करावे लागले. राजस्थानात अस्वस्थता आहे. मध्य प्रदेशातील सरकार तथे गेले आहे.
राहुल गांधी यांची वक्तव्ये कधी कधी ओरदार असतात. अनेकदा त्यांची चमकदार व पल्लेदार संवादफेक चर्चेचा विषय ठरते, राहुल गांधी यांनी नुकतेच कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगितले की, “डरपोक नेत्यांनी पक्षातून चालते व्हावे. आर. एस. एस. वाल्यांची काँग्रेसला गरज नाही.” गांधी यांनी हा हल्ला ज्योतिरादित्य शिंदे व जितीन प्रसाद यांच्यावर केला आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय असलेले हे दोघे अचानक भाजपवासी झाले. गांधी यांच्या असे दिसते की, हे दोघे कांग्रेस पक्षातले छुपे संघवालेच होते व ते गेले ते बरेच झाले.
एक काळ असा होता की, कांगेसच्या नावावर दगड उभा केला तरी तो निवडणुकीत विजयी होत असे. काँगेसची उमेदवारी म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी, हे चित्र आज बदलले आहे व कांग्रेस अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. गांधी घराण्यानंतर नरसिंह राव, मनमोहन सिंग (दोन वेळा) हे दोन पंतप्रधान काँग्रेसने दिले, तेव्हा काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधीकडेच होती व या काळात काँग्रेसला गळती लागली असे दिसले नाही. ज्योतिरादित्य जितीन प्रसाद है संपवाले तेव्स मनमोहन मंत्रिमंडळात होते. या दोघांनाही काँग्रेसनेच घडवले व भरपूर दिले. काँग्रेसमध्ये असताना है दोघेही भाजप आणि संपावर जोरदार हल्ले करीत होते, पण काँग्रेसचे घर फिरल्यावर वासेही फिरले.
प्रियंका गांधी या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात गेल्या तेव्हा लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्याभोवतीचा माहोल बनतो. पण या संघर्षात हवे राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीतच. प्रियंका गांधी शिकस्त करतील पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षात डररपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे पण पक्षातून डरपोक जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे का हे पाहावे लागेल अस शिवसेनेने म्हंटल.